शनिवार, १९ एप्रिल, २०१४

स्वतःपेक्षा

देवाने पंख नाही दिले पण
आकाशात उडण्याची जिद्द  ठेवते 
आयुष्य किती माहित नाही पण
भरभरून जगते 
जोडले नाहीत जास्त बंध
पण आहेत ते घट्ट ॠनानुबंध 
आपली अशी थोडीच माणसे
माञ त्यांच्यावर स्वतः पेक्षा जास्त प्रेम करते 
                                         मनस्वी

बुधवार, १४ ऑगस्ट, २०१३

ब्रेक-अप

आज मी त्याच्याशी ब्रेक-अप  घेतला
घेतला म्हणजे घेतला
अगदी ठरवले म्हणजे ठरवले
कि  आता बस्स झाले

आधीपासून तसा  तो  होताच
पण आजकाल थोड्याथोड्या
गोष्टींवरूनही तो मला
छळायला लागला होता  

जीवन म्हटले  की चढ उतार येणारच
पण म्हणून   त्याने मला 
प्रत्येक टप्प्यावर का छळतच राहावे ?
त्याचे अस्तित्व  दाखवतच राहावे ???

आजकाल तर त्याच्यामुळे
बिपिचा त्रास व्हायला लागला होता
डॉक्टर म्हणाले आता चाळीशी आली
त्याला सोड नाहीतर कायमच्या  गोळ्या घ्याव्या लागतील

अन मग मधुमेह…… किडनी  फेल,
परा लिसिस ,ब्रेन हमरेज अन काय  काय
मग म्हटले  याचे लाड करणे 
आता  बस पुरे झाले

शांतीने जगायचे तर
याच्याशी  ब्रेक-अप केलेलाच बरा
अन सोडला त्याला आता
अगदी सोडला म्हणजे सोडला

त्याचे नावही घ्यावेसे वाटत नाही
पण कधी तो तुम्हालाही भेटला तरी
त्याला तुम्हीही तुमच्या जवळ फिरकू देऊ नका
तो तो म्हणजे मला छळणारा तणाव(Tension ) …………

 

शनिवार, २० जुलै, २०१३

पुनर्जन्म

पुनर्जन्म म्हणजे मेल्यानंतर 
पुन्हा जन्म असतो का मला माहित नाही
पण याच जन्मात मी लेकीच्या जन्मात 
माझा पुनर्जन्म अनुभवते आहे………

तिचा निरागस गोड चेहरा 
यात मी माझे हरवलेले बालपण शोधत असते 
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर बरेच काही राहून गेलेले आहे  
पण तिच्या रुपात आम्ही पुन्हा सुखाचे क्षण अनुभवतो…………. 

तिच्या  आयुष्याच्या प्रत्येक वळणाची
मी सावली होऊन तिच्यासोबत असते 
माझे हरवलेले क्षण ती भरभरून जगते तेव्हा 
माझे जीवन कृतार्थ झाल्यासारखे वाटते……. 

तिच्या प्रत्येक यशाच्या पायरीसोबत 
माझ्या जीवनातील पराजय धुतला जातो 
अन मी पुन्हा पुन्हा नव्याने जगायला सिद्ध होते
एकाच जन्मात पुन्हा नव्याने जन्म घेते……  

तिचे रूप म्हणजे माझा अन तिच्या बाबांचा 
रूपाचा अन गुणांचा एकत्रित संगम 
आम्हा दोघांचे द्वैत जावून अद्वैताचा संगम  
आमच्या प्रेमाला परमेश्वराने दिलेली  देणगी  ……… 

खरंच परमेश्वर आहे हे तो 
प्रत्येक गोष्टीतून दाखवत असतो म्हणूनच  
तो आम्हाला आई बाबा बनवुन 
त्याचा  आम्ही अंश असल्याची प्रचिती देतो ……. 

माणूस खूप काही मिळवण्यासाठी धावत असतो
बाळ हवे म्हणून देवाकडे साकडे घालतो हरेक प्रयत्न करतो 
अन आयुष्याच्या एका टप्प्यावर तो आई किंवा बाबा होतो 
त्या ईश्वरीय अंशामुळे त्याला मातृ देव -पितृदेवाचा दर्जा मिळतो …

तो ईश्वरी अंश त्याच्या स्वतःपासून बनवून 
देवाने प्रत्येक सजीवावर किती मेहरबानी केली आहे
आपले बाळ प्रत्येकाला किती प्रिय असते 
कारण त्याला माहित असते कि याच्यामुळेच तर माझे जीवन आहे ………. 

नाहीतर मी जन्मलो वाढलो अन संपलो
मला काहीच अर्थ नाही 
कितीही धनसंपदा मिळवली तरी 
मी राहीन तरच याचा उपयोग…………… 

अन  बाळाच्या रूपाने 
मी जन्मोजन्मी जिवंत राहणार आहे
माझा मी पणा जपला जाणार आहे 
म्हणून मला मातृ-पितृदेव भव च्या जोडीला  कन्या-पुत्रदेव भव म्हणावेसे वाटते…….

मंगळवार, ११ जून, २०१३

नातीगोती

नातीगोती हवीहवीशी 
अन कधी नकोनकोशी 
ज्याच्याकडे  पैसा… सत्ता 
तो श्रेष्ठ  दर्जाचा बाकीचे  आपले नेहमीच नुसता गोतावळा 

पण  त्या गोतावळ्यातही 
प्रत्येकाला स्वतःचा  चेहरा असतो 
तोही आपली ओळख 
आपल्या परीने शोधतच  असतो 

श्रेष्ठ दर्जाचा म्हणवणारा
नातेवाईक कधी  पैशाने दाबतो 
तर कधी नात्याने दाबतो 
पण  मोठेपणाच्या अहंकारात तो बरोबरच असतो 


त्याची प्रत्येक कृती योग्य असते 
कारण तो मोठा असतो अन 
गोतावळ्यातला धडपडणारा होतकरू 
त्याचा हक्काचा  गुलाम असतो 

श्रमाची,हमालीची, मेहनतीची 
सगळी कामे त्याने करायची 
कारण त्याच्याकडे काय आहे 
इतके तर त्याने केलेच पाहीजे 

पैशावाला तो कधी
मोठा भाऊ कधी बहीणही असते 
नात्याचं मोठेपण त्यांना 
आयुष्यभर  मिरवायचे असते  

मोठेपण म्हणजे काय हे 
ते बरेचदा विसरतात 
अन लहानांनी लहानच राहावे
या हट्टाने  मग निसर्गतःच मिळालेले मोठेपण ते स्वतःच गमावतात  



  

म्हातारपण

म्हातारपण किती मुश्किल आहे
त्यांना वाटतेय आता यांना फक्त
दोन वेळच्या अन्नाची अन
औषधाचीच आता गरज आहे

आपण  नकोसे असणे
किती जीवघेणे असते
मरणयातना म्हणजे काय
हे अनुभवने असते

हो आम्ही जगलो वाढलो
अन म्तातारेही झालो
आता शरीर साथ देईनासे झाले
तर  जगण्यास का नालायक झालो???????

बालपण ते  प्रौढपण संपले
अन म्हातारपण सुरु झाले
पण म्हणून काय आमचे
आता जगणेच संपले  ???????

यांचे जिवंत असूनही
आम्हाला काय उपयोग आहे
हि नजरच जिवंत असतानाही
पुन्हा पुन्हा  मारत असते

तुम्हाला समजत नाही ….  
कळत नाही अक्कल  नाही …….
निट  राहा नाही तर जा दुसरयाकडे
हे जा जा काळजाला घरे पाडतात

त्यांच्या सणाला सुट्टीला
आमची  अडचण होते
अन हि अडगळ समजुन
माळया माळयावरून भिरकावली जाते

आता दिवस…महिने …वर्ष
हे चालूच  राहणार आहे
आमच्या अंतसमयीच का हे
आता सारे संपणार  आहे ??????????



गुरुवार, ९ मे, २०१३

अजूनही मी एकटाच


सांगायला तर ते आई बाबा होते
रथाची ती दोन चाके मात्र नेहमी एकमेकांचे 
विरूद्धच धावत होती अन
आम्हा पाखरांचे नशिबी फक्त हिंदकळणेच होते  

स्वर्गातली त्यांची गाठ 
पृथ्वीवर नेहमीच उलटी होती 
त्यांचे नेहमीचेच युद्ध वार मात्र
आम्हीच झेलत होतो 

दोधांच्या वागयुद्धाला 
घरचीच रणभूमी मिळाली होती
हरनाऱ्यालाही शस्त्र चालवायला 
आमची पाठ मात्र नेहमी हक्काची होती

दिवस बदलले, बदलले वारे 
प्रत्येक गोष्टीला मोहताज मी 
माझ्या कष्टाचे चीज झाले 
सर्व भौतिक सुख घरात आले 

माझ्या एकट्याचीही 
सुंदर चौकट झाली 
आता मात्र दोघांचेही एकमत आहे 
दोघांच्याही कष्टांमुळे???? माझे हे यश आहे 

आज मी भौतिक जगात यशस्वी अन सुखी? आहे 
मुलांसोबत आईबाबांचाही पालनकर्ता आहे 
जे हवे ते मिळवण्याची हिम्मत आहे 
असे सगळ्यांनाच वाटत आहे 

पण माझं होरपळलेले बालपण,तारुण्य
मी.....अजूनही एकटाच आहे 
कितीही अट्टाहास केला तरीही,
कितीही कष्ट केले तरीही मिळेल काहो मला ते निरागस,निर्मळ कोमल बालपण ......................
by Manaswi